पान:कार्यशैली.pdf/१०१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७४. वायफळाची जागा


 काल-परवा इंग्लंडमध्ये एक मजेदार शीर्षक असलेलं पुस्तक प्रकाशित झालं आहे.नाव आहे 'द बुक ऑफ युसलेस इन्फर्मेशन' म्हणजे मराठीत असं म्हणता येईल की वायफळ माहितीचे पुस्तक'.त्या पुस्तकावर परीक्षण लिहिणाऱ्यांनी म्हटलं आहे की वायफळपणामध्येसुद्धा किती अर्थपूर्णता असते हेच त्या पुस्तकानं दाखवलं आहे.
 आपल्या रोजच्या जगण्यातदेखील हेच खरं आहे.थोडी असेल पण जगण्याच्या रोजच्या धकाधकीत वायफळपणालाही जागा आहेच. प्रत्येक क्षण अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे उगाचच आततायीपणा आहे. उगाचच व्यर्थ खटाटोप आहे, यात शंका नाही.
 पार्कच्या भोवती संध्याकाळच्या फेऱ्या झाल्यानंतर टवाळ मित्रांसोबत जे बोलतो ते तसंवायफळच असतं किंवा चंदूचे वडील कुठेही आणि कधीही भेटल्यावर क्रिकेटवर जे बोलतात तेही वायफळच असतं.तसंच आमच्या सोसायटीच्या गेट टुगेदरचं वा आमचं रविवार सकाळच्या फिरण्याचं.

 या सगळ्या गोष्टीतून फार काही हाताला लागत नसलं तरी त्या वायफळ गोष्टी नसतील तर जगण्याची मजाही नाही हेही खरं आहे. त्यामुळं वायफळपणालाही जागा आहे हेच खरं.

कार्यशैली। १००