पान:कार्यशैली.pdf/१००

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७३. मनाची भेट एखादा दिवस असा उजाडतो,की तुम्हाला वाटतं मी आज दिवसभरात जे जे करायचं ठरवलं आहे त्याची काय गरज आहे? का मी इतकी थावाधाव करतोय? कशासाठी?
 असं वाटण्यात थोडा कंटाळा असतो, थोडा तोच तो पणा फार झाल्यानं आलेला उबगही असतो. पण असं असलं तरी खूपदा त्याचं कारण आपणच आपल्या मनाला रोखठोक प्रश्न विचारत नाही हे असतं.
 असा प्रश्न विचारत नाही आणि मग दिवसाच्या प्रवाहात रुटीनच्या धारेला लागून प्रसंगाच्या भोवऱ्यात अडकत अडकत आपण पुढे पुढे जात राहतो आणि विनाकारण लांबचा प्रवास करतो.असं एखाद्या दिवशी आपल्याला वाटतं तेव्हा ओळखावं, बरेच दिवस झाले आपण आपल्या मनाला नाही भेटलो, त्याला नाही विचारलं की त्याला काय हवं अन् काय नको. आज जे आपण ठरवलं आहे त्याची गरज आहे की नाही.

 मनाला रोज एकदा तरी भेटलं पाहिजे. शांतपणे. निवांतपणे.

९९। कार्यशैली