Jump to content

पान:कार्यशैली.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७५. मौनाचे गौडबंगाल



 माणसं बोलत का नाहीत? एखाद्या मीटिंगमध्ये किंवा चर्चेमध्ये अथवा गप्पांमध्ये माणसं गप्प बसून का राहतात? एखादी गोष्ट गैर घडत असली तरी माणसं मख्ख का बसतात?
 खूपदा मला वाटतं गप्प बसणाऱ्या माणसांना समजत नसावं. पण विचारावं तर ते मूर्खासारखं दिसेल म्हणून माणसं बोलत नाहीत. माणसं दमलेली असतात, थकलेली असतात म्हणूनही बोलत नाहीत. आत्मविश्वास नसतो, मनात गोंधळ असतो म्हणूनही माणसं गप्प राहतात. उत्साह नसतो,आग नसते. त्यामुळंही काय बोलावं असा प्रश्न काहींच्या मनात असतो. बोलून असा काय फरक पडणार आहे, असा निराशावाद काहींजवळ असतो आणि म्हणून माणसं मौन धारण करतात. भाग घेत नाहीत. सहभागी प्रवाहात अडथळा म्हणून राहतात.

 वाटलं, आपण एकत्र येतो विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, पण मग येतो आणि पुरेसा सहभाग देत नाही, तेव्हा आपण स्वतःला आणि बाकीच्यांना फसवतो असंच नाही का?

१०१। कार्यशैली