पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत- बॅ. जीना आणि मुस्लिम लीगचे सदस्य
 

अजूनही मानत नाही. आमच्या दृष्टीने धर्म पाळण्याचा किंवा बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता."
 “या काळात वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ते ढाक्याहून येथे येतात, तेव्हा माझ्याकडे उतरतात. पण आता इतर नातेवाईकही हळूहळू येऊ लागले आहेत."
 "खरे म्हणजे, तुम्ही माझ्या बहिणीला भेटले पाहिजे. तिचे यजमानदेखील हिंदू आहेत. किशनसिंग त्यांचे नाव. ते दोघे अलिगढला राहतात. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्येच किशनसिंगजींचे पुस्तकांचे दुकान आहे. तिथे तुम्ही कोणालाही विचारा, त्यांच्या दुकानावर तुम्हाला कोणीही पोचवेल. माझी बहीण सार्वजनिक कार्य करीत होती. तिच्याकडून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल."


कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ४३