पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुंबईतील भेंडीबाजार : १९५० चे दशक


बाजूंनी चाँदतारा असलेली लीगची हिरवी निशाणे फडकत असायची. मुस्लिम नॅशनल गार्ड्सचे स्वयंसेवक जीनांना ‘खडी ताजीम' द्यायला सज्ज उभे असत. व्यासपीठानजीक सर्वांत पुढे वृत्तपत्र प्रतिनिधींची बसायची व्यवस्था केलेली असे. त्यांच्या मागे आमंत्रित व नंतर जनसमुदाय असा क्रम ठरलेला असे.
 परंतु, त्या दिवशी या व्यवस्थेत काही तरी चूक झाली. आमंत्रित पुढे बसले आणि वृत्तपत्र प्रतिनिधींची व्यवस्था त्यांच्या मागे करण्यात आली. ही चूक आधी कुणाच्या लक्षात आली नाही. जीना नेहमीप्रमाणे व्यासपीठावर येऊन दाखल झाले आणि त्यांनी खाली दृष्टी टाकली; परंतु त्यांना वृत्तपत्र प्रतिनिधींचे नेहमीचे चेहरे दिसले नाहीत. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या चुंद्रीगरना त्यांनी संतप्त होऊन विचारले, “मिस्टर चुंद्रीगर, व्हेअर इज द प्रेस? आप क्या समझते है, मैं इन बेवकूफ मुसलमानोंके सामने तकरीर करने आया हूँ? आय वाँट प्रेस!"

 झालेला प्रकार चुंद्रीगर यांच्या तेव्हा लक्षात आला आणि त्यांनी जीनांची

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । १५