या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
छोरी...
गाभुळल्या चिंचेची ग चिमणीच्या दातांनी अन् |
चव आहे ओठावर उष्टावली कैरी कोर |
सोनेरी केसांचा दंगा अवखळ पाण्यातला |
अजूनही सतावतो खोटेपणा का डाचतो ? |
उन्हातल्या उनाडक्या मारातली अर्धांगी तू |
बागेतली चोर कैरी आठवते वेडी छोरी |
जग आता पलटले परी तुझ्या ओठी गातो |
यौवनाची होशी राणी भिजलेली झिम्मागाणी... |
● |
कविता गजाआडच्या /८६