Jump to content

पान:कविता गजाआडच्या.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  शैशव-चाहूल :
१९५७ ते १९५९ या काळातील कविता





चाहूल...

अनुभूतीचा गंध गारवा
मनासं माझ्या झुरवत जाई
स्पर्शातून बहरे गुलमोहर
धुंद.. धुंद मन थरकत जाई

त्या धुंदीची नशा आगळी
नशेत लपली व्यथा वेगळी
व्यथेत असते एकच जाणीव
ओलांडून मी आले शैशव

कविता गजाआडच्या /८५