या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शोध
सदाचीच मी सदा धुंडते
अनोळखी तळ त्या डोहाचा
संगत घेऊन दीप रूपेरी
पापणीतल्या निळ्या क्षणांचा
अंधाराच्या कणाकणातून
झिरपत असते माझे मीपण
मलाच नसते जाणीव माझी
माझ्या भवती माझे रिंगण
सदाचीच मी सदा धुंडते
अनोखी तळ त्या डोहाचा
माझ्यातील मी असते डोईच
कसा दिसावा तळ माझा मज ?
●
कविता गजाआडच्या /८७