पान:कविता गजाआडच्या.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रवासवर्णने आणि क्वचित नाटकातूनही आपला साहित्य प्रपंच विस्तारीत राहिली.
 एकोणीसाव्या शतकाअखेरी नुकतीच साक्षर होऊन बिचकन बिचकत पांढऱ्यावर काळे करणाऱ्या स्त्रीने विसाव्या शतकात मात्र आपल्या प्रतिभेच्या पंखांच्या कवेत खूप मोठे आकाश घेतले. आपल्या कर्तृत्वासाठी झगडत, संघर्ष करीत पुरुष मदतीच्या अपेक्षेवर अवलंबून न राहता आपला अवकाश स्वयंसिद्धपणे शोधीत राहिली. आपले स्त्रीत्व म्हणजे दुय्यमत्व नव्हे या भानातून संपूर्णपणे माणसाच्या हक्कासाठी आग्रही होऊ लागली आणि त्यासाठी अक्षरांचे अवकाश धुंडाळू लागली.
 स्त्रियांसाठी केलेले विवेकी पुरुषांचे प्रयत्न आणि सहकार्य, पुढे स्त्रीने त्यांना दिलेली बरोबरीची साथ, त्यातून स्त्री विषयक कायदे बदलून ते अधिक हितकर करवून घेण्यासाठी झालेल्या चळवळी आणि प्रत्यक्ष लाभ; विज्ञानाच्या नवशोधांमुळे प्राप्त झालेल्या सुविधा यातून विसावे शतक संपताना स्त्रीनेही आपल्या आत्मसामर्थ्याचा अनुभव घेतला. जुनी कोंडी काहीशी फुटली तरी नवे खाच-खळगेही निर्माण होत गेले. पण शिक्षण आणि वैज्ञानिक सोयींनी वाढलेली सपंर्क सुलभता जगभराच्या स्त्रियांमध्ये एक भगिनीभाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. स्त्री म्हणून असलेल्या सर्वांच्या समान सुख-दुःखांची देवाण घेवाण झालीच. क्वचित गाठीभेटीही झाल्या आणि त्यातून स्त्री विषयक विविधांगी विचार समस्यांचा गंभीरपणे- सखोल अभ्यास स्त्रिया करू लागल्या.
 या सर्वांतून विस्तारलेल्या तिच्या विचार भावनांचे क्षितिज अक्षरबद्ध होऊ लागले. प्रतिभावतींच्या साहित्यातून ते. अनेक परीनी व्यक्त होऊ लागले.
 विसावे शतक संपताना आंतरराष्ट्रीय महिला मुक्तिवर्ष (१९७५) आणि नंतर दशक जगभर साजरे झाले आणि एकविसाव्या शतकात प्रवेश करताना महिला सक्षमीकरण वर्ष साजरे करण्यापर्यंत मजल मारली.
 स्त्रीचे माणूसपण केवळ शब्दातून मान्य होऊन भागणार नाही तर तिचे सर्वांगी लादलेले खरे-खोटे अ-बलस्व झटकले जावे, तिला सर्वांगी सक्षमत्व यावे हा हेतू !
 वर्ष साजरे झाले की, हेतू लगेच साध्य होत नाही हे खरे! पण निदान जनमान्यतने प्रारंभ होती. हे महत्वाचे!
 अशा या संधिकालात महिला सबलीकरण वर्षाची सांगता होत असताना डॉ. शैला लोहिया यांचा 'कविता गजाआडच्या' हा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. हे विशेष लक्षणीय आहे.
 डॉ. शैला लोहिया या मराठवाड्यातल्या आंबाजोगाई या काहीशा आडवळणावरच्या गावात राहून गेली सुमारे दोन तपे स्त्रियांसाठी आणि सर्वार्थान उपेक्षित अशा समाजघटकांसाठी