या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
निर्धार
या मातीच्या हृदयामधली स्वप्ने करु साकार
सामान्यांच्या जगण्यासाठी एक नवा आधार
हा अमुचा निर्धार ॥
ग्रीष्म झळांनी करपून गेली
धरणीच्या हृदयातील गाणी
पर्णहीन झाडांच्या ओठी
मुक्या नभांची सुन्न कहाणी
भगीरथाचे हात हजारो
देतील नवा आकार
मातीच्या ओठातून फुटतील
प्रतिभेचे ओंकार ... १
श्रमलक्ष्मीची इथे प्रतिष्ठा
समानतेवर जीवन निष्ठा
कवेत घेऊन दिगंत जाऊ
नव्या दिशांनी शोधित वाटा
खडकावरती उगेल नवती
आम्हा आर ना पार
आभाळातून झेपत येईल
उन्मेषाची धार .... २
कविता गजाआडच्या /८०