या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गझल माझ्या मुक्तीची
अंधार सोसण्याची निष्पंख पाखरांनी |
सांगू नये कहाणी गाऊ नयेत गाणी |
चुनडीत बांधलेल्या हाटात मांडलेल्या निस्पंद रान अवघे सूर्यास्त जाहल्याची |
गाथा उदासवाण्या ओल्या कबंध-वेणा पानात पेटताना आळवू नये विराणी |
जन्मोत्सवी कळांनी वक्षातल्या दुधाचे शब्दात धुमसणाऱ्या उधळून वाहनारे |
आभाळ गोंदवीले विकले रतीब सगळे वाऱ्यास कोंडताना आडवू नयेच पाणी |
होऊन नग्नरेखा भेगाळल्या करांनी आकाश भोगण्याचा पंखासवे फुटोनी |
फेडून वस्त्र हिरवे सोलून गर्भ हळवे उन्मेष थाटताना यावी पहाट गाणी |
कविता गजाआडच्या / ७९