Jump to content

पान:कविता गजाआडच्या.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणुसकीची इथे लावणी
सौहार्दाची सत्व पेरणी
हृदयामध्ये राम रहिम अन्
ओठावरती कबीरवाणी

महावीर येशू गांधीचा
सत्याचा आधार
बुध्दाच्या करूणेने भिजली
हृदये अपरंपार    

कविता गजाआडच्या /८१