Jump to content

पान:कविता गजाआडच्या.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी: १९९१...९४...२००१...३००३ वगैरे


आज
मी एक बाईच!
सर्व दिशातून...अष्टकोनातून
मला निरखणाऱ्यांसाठी,
होय तुझ्यासाठीही.
मी
एक मुक्त आदर्श स्त्री...
वगैरे...! वगैरे.....!
पण,
सकीना.. अनु...मंगल...सायरा
विजू...काशी...कान्ता...लोरा
यांच्या सारखीच मीही.
'पुरुषार्थाशी' झुंजणारी
आणि तरीही
भुईतून वर डोकावणाऱ्या
कोंभा सारखी
मोकळ्या आकाशाला झेलणारी !!!

कविता गजाआडच्या / ७०