या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वेडगाणे
| एक आहे झाड माझे त्याच झाडाच्या उराशी |
पावसानी पेटणारे गुंफले मी वेडगाणे |
| एक आहे गाव माझे त्याच गावाच्या शिवेला |
सावल्यांनी सांजणारे बांधले मी वेडगाणे |
| एक माझा सूर साधा त्या सुरांच्या सांगती |
उजळताना कापणारा छेडले मी वेडगाणे |
| एक माझी मीच...मीही श्वास उसवित धावताना |
दो तिरांना कळवणारी संपलेले वेडगाणे |
कविता गजाआडच्या /६९