या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन सवाल.. (कै. अनामिकेचे)
आत्मा चालला उपासी
दूर दूरच्या गावाले
माय मातीच्या कानात
दोन सवाल पुशिले
गाठगाठ पदराला
वल्या वढाळ वळखी
माती मातीला मिळता
पुढे निघाली पालखी
पालखीत कोन राणा ?
त्याले काय रूप रंग?
कुन्या जातीचा पालव
आता डुईवर सांग... !
कुकवाच देनं..घेनं
काया मन्यांचा वायदा
परदेसी पराईण
तिले कोनाचा कायदा ?..?
काया मातीची वाकळ
आता मागंच फिटली
आभायाच्या अंतरात
येक जखम गोंदली.. !!!
कविता गजाआडच्या / ६८