या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संग
न्हात्याधुत्या मातीचे
भांग कोनी रेखिले ?
मोतियांचे गजरे
वर कोनी माळले ?
न्हात्याधुत्या मातीचा
भरजरी नखरा
बिलवरी कशिदा
काढियला पदरा!!
न्हात्याधुत्या मातीचे
अंग अंग चेतले
कंवारिण कळीचे
गंध कोनी झेलले ?
न्हान्याधुत्या मातीचा
शिणगार साजिंदा
सावळिया रूपाले
भुलला वो गोईंदा !!
न्हात्याधुत्या मातीचे
आवतन कोनाले ?
कोनी केलं चेटूक ?
कोनी रंग चोरले ?
कविता गजाआडच्या /६०