या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वल्या वढाळ मायेचा
कसा धरावा भरोसा ?...
किती घालशील येढे ?
किती ओढशील फेर?
ऊर फुटेतो सोशीन
तुह्या पावलांचा जोर
उभी ठाकले कधींची
मले माझाच भरोसा...
येक ध्यानामंदी ठेव
तुज्या थकलेल्या जीवा
माझ्या मांडीचा विसावा...
अरे पावसा पावसा
●
कविता गजाआडच्या / ५९