पान:कविता गजाआडच्या.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाऊस (२)

माझ्या मनाची कवाडं
आज कोनी मोकलली?
झिमझिमत्या सरीनं
भुई वलीकंच झाली...

अंग..अंग गह्यरलं
जसं शहारलं रान
अंधाराच्या वाटेवर
कोनी अंथरलं ऊन ?

झणानत्या वाऱ्यासंगे
देह झुंजून शिणला
थेंबा थेंबी निथळून
जीव पैंजणांचा झाला...

माझ्या मनाची कवाडं
घेती आभाळ सामोरी
गाठ...गाठ सुटताना
भरू आले प्राणभरी...!!!

कविता गजाआडच्या /५७