पान:कविता गजाआडच्या.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भंवरीबाई...

बीजींगच्या वाटेवर
तुझ्या हातात हात गुंफले
नि
पुन्हा एकदा कडकडून भेटलीस
भवरीबाई तू.


तेव्हापसवर
वर्तमानपत्रांच्या
मथळ्यातून
आणि
धुसमुसत्या शब्दागारातून
मस्तकात सणसणत फिरली होतीस
गोफणगुंडा फिरवीत.


त्या विभोर सायंकाळी
मात्र
कृष्णतुळशीच्या रंगातून
मिणमिणत्या पहाट - डोळ्यातून
अंगभर जाणवलीस
तनामनात भंवरलीस
आणि
बीजींगची वाट कशी
पायाखाली आल्यागत वाटली.
...
आज
पुन्हा

कविता गजाआडच्या /५४