Jump to content

पान:कविता गजाआडच्या.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या क्षणी
पापणीतून उगवलीय
नीरव.. स्वयंभू पहाट
जी
भर बाजारात
डोईवरचा पदर
खांद्यावर घेणाऱ्या
जनाईला सापडली होती
...
उठा बायांनो उठा
आवरा झरा झरा
बिजींगच्या धावपट्टीवर
इमायनानबी
पाय टेकलेत
उतरा माय उतरा...
...
तर,
रावणाच्या
उजव्या पायाचा अंगठा
कैकयीच्या
आज्ञेने
मनभरून...
चित्रफलकावर रेखणाऱ्या
भवभूतीच्या सीते,
आज
मीही मानणार आहे आभार
रावणाचे
....

कविता गजाआडच्या / ५२