या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तू...
मीरे,
घनदाट आभाळाचा
हात धरून घुमणाऱ्या
माझ्या ज्ञानूला
रूणझुणत्या वाऱ्याच्या नितळ आरशात
दिसली होती
स्वतः अैवजी
विराणी राधा.
आणि आज?
मलाही उमजलं नाही
की
तुझा
निर्भय धीराचा
घूॅंमर घागरा
आणि
नीडर सत्याची तलम ओढणी
माझ्याही अंगभरून
कधी भिरभिरायला लागली ते !!!
मैत्रिणी मीरे,
तू...मी... नोरती.. भंवरी... साबिया
किंकरी.. झरिना... नर्गिस..जया
अशा शेकडो... हजारो
न पाहिलेल्या प्रदेशाच्या
पाऊलवाटेने धावणाऱ्या...
...
कविता गजाआडच्या /५१