Jump to content

पान:कविता गजाआडच्या.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आज...

विस्तवातही होती
विस्तवात आज फक्त
 रूणझुणती धारा
 राख अन् निखारा...
श्वासांतुन शिरीषगंध
पोखरले शब्द आज
 थिरकते बहार
 श्वासांना भार...
तेव्हाचे दिवस कसे
उतरत्या उन्हांचाही
 सावनी उन्हाचे
 आज डंख जाचे
स्वप्नांची चळत उभी
ओंजळीत आज फक्त
 रस्त्यावर होती
 रखरखती माती...

कविता गजाआडच्या /४५