या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वळणावर वळताना
वळताना वळणाशी एकदाच तुटलेले |
पाहू नको मागे छेडू नको धागे |
एकदाच सोसवेल नको असे कुरवाळू |
जीवघेणी कळ ओलेते वळ |
पतझडीत वाहती वळवसरींनी नको |
एकदाच पाने पेटवूस राने |
खुडन फूल जा खुशाल माझे मज ठेवुन जा |
चोरु नको बोटे मखमाली काटे |
वळणावर वळताना अडखळून जागेवर |
चढव नवा साज लागो मज ठेच |
● |
कविता गजाआडच्या /४१