पान:कविता गजाआडच्या.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तू नि मी...

तू अस्वस्थ
भळभळती जखम
सोसणाऱ्या
अश्वत्थाम्यासारखा!
अरे,
अवघा एक बिंदू निखळला
तर
तू एवढा खिळखिळा ?
अस्तित्वाचे रंग हरवलेल्या
आभाळा सारखा !!!
एक
बंदा रूपया
एक पै उणावली तर
निष्पर्ण
आणि
एकाकी?
....
मी तर प्रत्येकक्षणी
एकेक बिंदू हरवत
जगत्येय..
किती म्हणून मोजू
हरवलेले हुंदके ?
पण
आम्ही स्वतःला
हरवतच जगायचं असतं
कविता गजाआडच्या /४२