या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रिय...
प्रिय,
त्या झाडांच्या
पानांची सळ्-सळ्
अजुनही
श्वासागणिक झुळझुळतेय.
त्या झाडांचं नाव
माहित नाही मला
पण
हेमंतातल्या पानगळीसाठी
हरेक क्षण राखून ठेवलाय मी !!
प्रिय,
दूर...दूर जाणारं प्रत्येक गाव
ओल्या फांदीवरून गळणारं
हर एक पान
उदास सायंकाळी मलूलणारं
एकेक शिरीष फूल
तसंच
तुझं नावही
दूर...दूर.. वहात गेलेलं.!
प्रिय,
चालता चालता
केवढं अंतर पडलं तुझ्यामाझ्यात !
अरे!
कविता गजाआडच्या /३९