या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पळस रानी रंगले
कवळुनी आभाळ पिवळे मी तुझ्या ओठातला |
पळस रानी रंगले अंगार पिऊनी बहरले |
मी मुक्या रानात माझी पंख मिटवुन शब्द सारे |
सात गाणी पेरली कोटरातुन कोंदले |
गळून गेलेल्या फुलांची वाळक्या फांद्यातले का |
याद कुठली पाखरा? प्राण आजच बहकले !! |
उतरतीच्या सावल्यांनी सावळे अंधार कवळून |
पेटविल्या दशदिशा चन्द्र भाळी गोंदले |
● |
कविता गजाआडच्या /३२