या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दूर होई साजणा
| चांदण्याचा पूर आता दूर होई साजणा |
लागला रे ओसरू वस्त्र दे मज सावरु |
| या उजेडा सांगती अन् तुझ्या माझ्या व्यथांची सोहळ्याचे स्वप्न मिटवून |
रीत होईल जागती चूड होइल पेटती... ये जगाची लय धरू |
| सोनलाटांतून मिटली केवड्याचा गंध सोसून भर दुपारी चांदण्याचे |
चांदण्यांची अक्षरे हो जुईची लक्तरे स्वप्न पाहत मोहरू |
| उधळुनी सोळा कळा बाभळीचे स्वप्न रेखित तृप्तीने अतृप्त होऊन |
अंधार लेऊन रेशमी या इथे येईन मी वाट मज देई धरू |
| ● |
कविता गजाआडच्या /३१