या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऋतूसंग झेलले
सरले ऋतू फुलांचे वाटेवरी तुझ्या रे |
जाणार तू पहाटे मी प्राण पसरिले |
जखमा इथे फुलांना सजवून कंटकांनी |
पाने धुळीत गळती फुलदान मिरविले |
वाहून जाय पाणी दगडी चिरे विटांनी |
पाने धुळीत गळती इतिहास मढविले |
वार्ता दहा दिशांना गंधार्त पाखरांनी |
कोणी दिले निरोप आभाळ बहकले |
जडशीळ पावलांना वाटेतल्या धुळीने |
घालू नकोस शपथा ऋतु संग झेलले |
● |
कविता गजाआडच्या /३३