पान:कविता गजाआडच्या.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुगी

जवसाच्या पानांवर
निळं आभाळ झुकलं
काळ्या वावरात सये
वाजे कोनाचं पाऊल?

पानी पिऊन तर्राट
हुबा ऊस दावी धाक
हर्बऱ्याचे कवळे रान
तुह्या पदराने झाक !

कोऱ्या अंगाच्या गंधानं
हुब्या झाडात सळ् सळ्
जित्त्या दांडाच्या पाण्यानं
भिजे कोनाचं पातळ ?

आली हुर्ड्यात जवार
होटी दुधाळ चांदनं
पिक्क्या बोरीच्या रानात
सोन्यामोत्यांचं झुल्लनं...

गळाभर सोन ठुशा
ओंब्या लोंब्याची झिळ्-मिळं
कविता गजाआडच्या /२९