पान:कविता गजाआडच्या.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सजल वसंत

आयुष्य टांगले उलटे
अंगणात मेढी वरती
उतरती उन्हे वळताना
ओंजळीत उरली माती

भरतीचे अवघे पाणी
उंबऱ्यात अडुनी फुटले
मी मुक्या कळ्या फुलतीच्या
पदरात झाकुनी जगले

पर्णासम गळले आसू
निष्पर्ण उभी दारात
वेणांतुन फुलेल केव्हा
पर्णांकित सजल वसंत

कविता गजाआडच्या /२८