पान:कविता गजाआडच्या.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गझल गजाआडची

चांदण्याचा थवा
डोळियातून आज
 संथ झुले वरती
 रात्र रात्र जागती
सांगाती थंड रुंद
त्या रात्री अधूरीच
 भिंतींची साथ
 राहियली बात
प्रश्न खुळे छेडती
हसताना कोंडले
 चिमण्या ओठांचे
 पाऊस डोळ्यांचे
गजाआड माती परी
दूरातुन जडवितो
 मनमयूर मुक्त
 निखळता स्वरान्त
मिटू..मिटू डोळे अन्
मनातून मोहरती
 विझू विझू वाती
 मग्न.. भग्न गती

कविता गजाआडच्या /२७