पान:कविता गजाआडच्या.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुलताना

श्वास.. श्वास कोंदाटले
प्राण झुरे काठोकाठ
कशी आवरू ग सये
ओठातली गंधलाट?

पान..पान पुसटले
देठ झाले मुके..मुके
कशी आवरू ग सये
डोळ्यातले दाट धुके?

सांज दाटुनिया येता
दूर..दूर..गेले गाव
फुलताना विसरले
मूळ..मातीचेही नाव..

कविता गजाआडच्या /२६