पान:कविता गजाआडच्या.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा आधुनिक छंदातून आधीची अधिक ओढ असल्याचे जाणवते. तसेच सर्वसामान्य श्रमकरी ग्रामीण स्त्रीच्या हर्ष-शोकांची, व्यथा-वेदनेची अभिव्यक्तीही अगदी सहज स्वाभाविकपणे मराठवाड्यातल्या ग्रामीण बोलीतून होते. बोली ग्रामीण असली तरी जाणीव आणि अभिव्यक्ती मात्र नवीन आहे.

"माये माझिये दाराची
कड़ी कोनी उकलली'
सेये उजेडाची रेघ
घुसळून आत आली
(सये उजेडची रेघ)
किंवा
"पन आज
माझ्या चुलीतून झालाय
नवा सुर्ब्य
मला बी कळलया
की दुसऱ्याच्या काळजावर
फुंकरल्या बिगर
माझ्या दुःखाचं गठुडं मला फेकता येनार नाय "
    (मी एक बाई)

 शैलाताई संस्थाचालक, संघटक. कार्यकर्त्या आहेत. त्यामुळेच असेल त्यांच्या काही कविता समूहगीतात्मक आहेत. तरीही त्यात प्रचारकी आवेशापेक्षा संवेदनशील कवी पणच प्रकर्षाने दिसते. उदा. 'निर्धार', 'गझल माझ्या मुक्तिची' किंवा त्यांनीच अनेक शिबिरात गाऊन सर्वपरिचित झालेली 'मी वो कोन्या नसीबाची' ही आणि अशा काही कविता !
 या कवितेतूनही 'मी माझ्या नशीबाची।' म्हणणाऱ्या एका पारंपारिक लोककथेतील बंडखोर मुलीचा उद्गार आठवतो. ही बंडखोरी पूर्वापार बाईच्या रक्तात असल्याचे त्या जणू सुचवतात आणि त्याच वेळी नवभान अल्याने अधिक परखडपणे स्वतःचा स्वंतत्रपणा जपू पाहणारी स्त्रीही आपल्या समोर उभी करतात. मरणानंतरही बाईचं पुरुषसापेक्षत्त्व तिला ही व्यवस्था सोडू देत नाही. ती साठवण मेली तर सौभाग्यलेण्यांचं लोढणं तिच्यावर लादून पुढच्या जन्माच्या वायद्याशी तिला बांधलं जातं, तिच्या भाग्याचा हेवा केला जातो. मग ह्या जन्मी तिची किती का ससेहोलपट होईना. पुरुष वर्चस्व तिला मरणानंतरही मोकळे होऊ देत