मनें ओढून घेतलीं. काँग्रीव त्याचें नांव. तो एक धर्मप्रचारक धर्मोपदेशक होता. ऑगस्ट कॉम्टे याच्या तत्त्वांप्रमाणे वागण्यासाठी त्याने फार मोठा त्याग केला होता. त्या त्यागी ध्येयवादी काँग्रीव्हचे भोवती तरुण आले व शक्तिदायी केंद्र निर्माण झालें.
आणि मध्ययुगांतील इंग्लंडमधील कलाप्रांतांतील ही चळवळ— या चळवळीचा एकोणिसाव्या शतकांत जास्तच स्पष्टपणे विकास झालेला दिसून आला व या चळवळीच्या मुळाशीं रोझेटी, मॉरिस, बर्नजोन्स, सॅमिऑन, सॉलोमन आणि इतर उत्कट माणसें होतीं.
स्वतःची शक्ति वृद्धांना कमी मानूं दे, त्यांना स्वसामर्थ्याची जाणीव नसेल, आपणांमध्ये केवढे सुप्त सामर्थ्य आहे याची त्यांना कल्पना नसेल; स्वशक्तीची अवहेलना त्यांना करूं दे; परंतु तरुणांनीं स्वशक्तीच्या बाबतींत साशंक रहावयास नको. भविष्यकाळ हा तरुणांचा आहे. तो त्यांची वाट पहात आहे. भविष्याच्या पहाडांत लेणी खोदायला चला. या वसुंधरेचा वारसा तरुणांकडे येणार आहे, दुसऱ्यांकडे नाही—
विद्यापीठे म्हणजे केवळ चार लोकांची संघटना नव्हे. तेथें आशा व विचार पाहिजे. आशावंत विचारवंत व प्रज्ञावंत, अशांचा संघ तेथे पाहिजे योग्य दिशेने कलेला वाहून घेणाऱ्या दोन व्यक्ति निघू देत— दोनच पुरेत. आणि साऱ्या भारतांतील कलाक्षेत्रांत ते क्रांति घडवून आणतील. कांहीं कलोपासकांना स्वतः समोरील गंभीर प्रश्नांची उत्कटता व उज्ज्वलता पटूं दे, व्यापकपणाने ती त्यांना समजावून घेऊ दे— आणि मग नवकलेचा जन्म झालाच समजा. जीवनांतून जीवन निर्माण होतें,