Jump to content

पान:कला आणि इतर निबंध.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कलेचा संदेश
३५
 

वादविवादांतून तेथे मांडल्या जात व वरिष्ठ वर्गाच्या भांडवलवाल्यांच्या मुलांकडून ज्या अभिमानाने स्वीकारल्या जात, त्याच पुढे राष्ट्रांत झाल्या व हा साम्राज्यवाद क्षुद्र व घाणेरडा असा निर्माण झाला. याच्या उलट लॉर्ड रिपन हाही आपल्या तरुणपणांत एका अत्यंत खाजगी संघाचा सभासद होता. त्या संघाचें नांव 'ख्रिश्चन सोशॅलिस्ट्स' असें होतें. या संघाच्या सभासदांत चार्लस किंग्स्ले व टॉम हह्यूजेस अशीं नांवें होतीं. अशा या संघांतच लॉर्ड रिपन व त्याची पत्नी पराजितांबद्दल प्रेमवृत्ति बाळगण्यास शिकली, पराजितांची बाजू घ्यावयास, पक्ष उचलावयास शिकली; न्याय व समता हीं तत्त्वें या संघांतर्फे त्यांनी जीवनांत भरून घेतलीं. न्यायासाठीं उभे राहण्याचें धैर्य त्यांनी या संघांतच मिळवलें व त्यासाठीं त्यांचीं नांवें इतिहास आहे, तोपर्यंत चमकत राहतील.
 लंडनमध्ये लोकसत्तेच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या संस्थांत फेबियन सोसायटी (समाजसत्तावाद्यांची) ही प्रमुख संस्था आहे. या संस्थेचा आरंभ कांही अत्यंत कष्टाळू व तरुण अशा नारी- नरांनीं केला. कांहीं पुस्तकांचा, कांहीं ग्रंथांचा शनिवारी तिसऱ्या प्रहरीं अभ्यास करण्यासाठीं कांही स्त्रीपुरुष एकत्र येऊ लागले, व त्या ग्रंथांतून येणाऱ्या सामाजिक प्रश्नांची ते चर्चा करूं लागले. ही लहानशी संस्था आज फेबियन सोसायटी म्हणून सुप्रसिद्ध आहे.
 लंडनमध्ये दुसराही एक असाच पॉझिटिव्हिस्ट लोकांचा संघ आहे. इंग्लंडच्या बौद्धिक जीवनांत नैतिक भावना ओतणारी ही दुसरी एक प्रचंड शक्तिशाली संस्था होती. कांही वर्षापूर्वी ऑक्सफर्डमधील कांही हुशार व तेजस्वी विद्यार्थी एका गुरूभोवती जमले. एका गुरूने त्यांचीं