Jump to content

पान:कला आणि इतर निबंध.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राष्ट्रीय भावना निर्माण करण्यांत कलेची कामगिरी
२१
 

ल्लोकीन कलेच्या नमुन्यांत कालातीत व स्थलातीत असेही कांही असतें मर्यादित देहांत अमर्याद मन, त्याप्रमाणे त्या मर्यादित कलेच्या नमुन्यांतही विश्वव्यापक, सर्व हृदयस्पर्शी असें कांहीतरी असतेच असतें, व तें विजयी होतें; तें जगाला डोलवतें. पाश्चिमात्य कलेतील प्रसिद्ध मॅडोना व तिचें मूल हें मायलेकरांचें सुप्रसिद्ध चित्र उदाहरण म्हणून घेऊं. चितपुर रोडमध्ये गेलें म्हणजे या चित्रांच्या प्रती दिसतात व तिकडे लक्ष्य गेल्याशिवाय रहात नाहीं. हें चित्र कां बरें सर्वांची दृष्टि ओढून घेते? कारण या चित्रांत सर्वांना परिचित, अत्यंत जिव्हाळ्याचे असे भाव आहेत. या चित्रांतील हेतु जीवमात्राला मुग्ध करणारा आहे. तें चित्र अडाण्यालाही आवडतें, तोही तें प्रेमानें हृदयाशी धरतो. त्या चित्रांतील त्या दोन व्यक्तीची जीवने भारतीय गिऱ्हाइकांस माहीत नसतील, त्यांचीं नांवें माहीत असली तरी इतर कांहीं माहीत नसेल. त्याला तें दिव्य बाल्य-जन्म-काव्य माहीत नसेल; त्या दिव्य पुत्रजन्माच्या कथा माहीत नसतील; परंतु कांहींही असो, त्या चित्रांत आई आहे व तिचें बाळ आहे. बस्स. साऱ्या जगाला समजतें तें चित्र. मायलेकरांचें प्रेम सर्वत्र दिसून येत आहे. आई लेकराला पाजीत आहे, त्याला वात्सल्याने पहात आहे, हें दृश्य कोणाला माहीत नाहीं, कोणी पाहिलें नाहीं? कलेमध्ये हें जें सकल- हृदयस्पर्शी असतें, तें स्थानमर्यादा, कालमर्यादा दूर करतें व सर्वांना जवळ आणतें तो कलेचा नमुना सर्वांचा होतो. परंतु आपण अशी कल्पना करूं या कीं, भारतीय चित्रकारानें असेंच अनुपम अत्युकृष्ट भारतांतील माय-लेकरांचे, बाळबाळंतिणीचें जर चित्र काढले, साधे, अर्थपूर्ण, गंभीरता व कोमलता, मंगलता, दिव्यता यांच्या भावना मिसळलेले असे काढले तर