तर आपण त्याचें कौतुक करूं. तें मंदिर तेथील वातावरणांत नीट पद्धतशीर अशा प्रमाणबद्धतेनें उत्पन्न झाले. त्या देशांतील पद्धतीचें तें प्रतिबिंब आहे, प्रतिनिधिरूप आहे. त्या मंदिराचे विशेष आपणांजवळ बोलतात; ज्या गोष्टी सर्व हृदयांत आहेत, त्या गोष्टी तें मंदिर आपणांजवळ बोलतें. त्या ईजिप्शियन मंदिरासारखे मंदिर जर कोणाला करावयाचे असेल, तर ज्या लोकांनीं तें मंदिर बांधलें, त्या लोकांतीलच जणुं एक त्यानें झालें पाहिजे; त्याने स्वत्व विसरून इजिशियन झालें पाहिजे; त्यांच्या आशा, त्यांच्या भावना, त्यांची ध्येयें, विचार, जीवनसरणी, त्यांचा धर्म, त्यांची श्रद्धा, त्यांची प्रार्थना— सर्वस्वी तद्रूप असें त्यानें झालें पाहिजे. असें असल्यामुळे त्या काळांत त्या मंदिराचे जितकें कौतुक केले जात असेल, त्या काळांत तें जसें बोलत असेल व त्याचें बोलणें समजलें जात असेल, तसे आज ईजिप्तमधील लोकांजवळहि तें मंदिर बोलणार नाहीं, मग बाहेरच्यांची तर गोष्टच सोडा. आपणांस त्या प्राचीन काळांत स्वतःला संपूर्णपणे घालता येत नाही; यामुळे त्या मंदिराचें सम्यक् ज्ञान आपणांस होत नाहीं व सम्यक् ज्ञान नाहीं, म्हणून सम्यक् आनंदही नाहीं; कारण, कितीहि भावनोत्कटतेच्या उकळ्या आपण दाखवल्या व दांभिक असा क्षणिक गहिंवर दाखविला, तरी अवशेष, पडकी इमारत, ओसाड पुरातन भाग गजबजलेल्या इमारतीपेक्षां केव्हांही अधिक सुंदर वाटणार नाहीं, असणार नाहीं. जीवनांतील रोजच्या परिचयानें प्रेम निर्माण होत असतें, वस्तु प्रिय होत असते.
चित्रामध्ये, कलेमध्ये दोन भाग असतात. ज्याप्रमाणे क्षणभंगुर शरिरांत अमर आत्मा असतो, त्याप्रमाणें स्थानिक, तत्तत्कालीन, तत्त
पान:कला आणि इतर निबंध.pdf/२३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
कला आणि इतर निबंध