Jump to content

पान:कला आणि इतर निबंध.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कत्त्यास त्यांनीं मुलींची शाळा काढली. प्रथम या पाश्चिमात्य बाईच्या संस्थेत कोणी मुली पाठवीना. त्यांनीं घरोघर जाऊन मुलींची भिक्षा मागावी. सायंकाळी शाळेतील मुली घरोघर नेऊन पोचवाव्या. त्यांची तपश्चर्या फलद्रूप होऊं लागली. शाळा भरभराटली. ही शाळा म्हणजे त्यांचें जीवन. सर्व कांहीं शाळेसाठी. रात्रंदिवस शाळेचें चिंतन. जें काम हातीं घ्यावयाचें त्यांत सारा आत्मा ओतावयाचा, ही तर गीतेची शिकवण.
 पै न् पै या शाळेसाठीं खर्च होई. निवेदिता तपस्विनीप्रमाणें रहात. त्यांच्या खोलींत कांहीं नसण्याचें सौंदर्य होतें. त्या खोलींत फक्त एक चित्र होतें. तें त्यांच्या शाळेतील एका मुलीनें काढलेलें होतें. आपल्या शाळेंतील विद्यार्थ्यानें काढलेल्या चित्रानें आपली खोली सजविणारे कितीसे शिक्षक असतील? एकदां प्रख्यात कलाभ्यासी व कलाटीकाकार श्री. कुमारस्वामी निवेदितादेवीस भेटावयास आले होते. कलेवर बोलणें झाल्यावर कुमारस्वामी खोलींतील तें चित्र पाहून म्हणाले, "सुंदर आहे हें चित्र." निवेदिता म्हणाल्या, "आमच्या शाळेतील मुलीने काढलें आहे तें." कुमारस्वामी निघून गेल्यावर निवेोदितादेवी त्या मुलीच्या घरीं धांवत गेल्या व म्हणाल्या, "पाहिलेंस, कुमारस्वामींनीसुद्धां तुझें चित्र चांगलें ठरविलें. केवळ मीच नाहीं. चांगलेच आहे तुझें चित्र." त्या मुलीला किती आनंद झाला असेल! खरा शिक्षकच असें करूं शकतो.
 एकदां निवेदितादेवी आपल्या खोलींत बसल्या होत्या. कलकत्त्यास उन्हाळ्यांत फारच उकडतें. जसें शिजल्यासारखें होतें. निवेदिता आपल्या खोलींत पुट्ठयाच्या एका तुकड्यानें वारा घेत होत्या. इतक्यांत कोणीतरी मुलाखतीसाठीं आलें. मुलाखतवाला म्हणाला, "एकादा पंखा का