नाहीं घेत विकत?" ही थोर सेविका म्हणाली, "पंखा कसा घेऊं? तो आणा माझ्या शाळेसाठीं नको का?" किती संस्थाचालकांस आपल्या संस्थेविषयीं असें प्रेम असेल, तिच्यासाठीं असा त्याग करावा असें वाटत असेल?
राष्ट्रीयत्वाचा अभिमान आपल्यापेक्षां निवेदितादेवींना सहस्त्रपटीनें अधिक वाटे. आपल्या देशी बोलण्यांत मधून इंग्रजी शब्द येतात. त्यांना हें खपत नसे. एके दिवशीं त्यांच्या शाळेतील मुली आपसांत बोलतांना, "लाईन, लाईन" हा शब्द वरचेवर उपयोगीत होत्या. निवेदिता जात होत्या. त्या थांबल्या व म्हणाल्या. "लाइन लाइन काय म्हणतां? त्याला बंगाली शब्द कोणता?" मुलींना पटकन् सांगतां येईना. एकीनें "रेखा" हा शब्द सुचविला. निवेदितेस परमानंद झाला. त्या म्हणाल्या, "हां, बरोबर. लाईन म्हणजे रेखा. रेखा." असें म्हणून तो शब्द घोकीत त्या निघून गेल्या.
त्यांनी प्रौढ स्त्रियांसाठींही वर्ग उघडले. बंगाली स्त्रियांत पडदा आहे. पडदानशीन स्त्रिया येणार कशा ? शेवटीं निवेदितादेवी एका घरी जात. तेथें बाया जमत, निवेदिता तेथे शिकवीत व मग बायका पुन्हां पडदानशीन होऊन आपआपल्या घरी जात. कांहीं दिवस या घराशेजारींच त्या स्वतः येऊन राहिल्या.
अशा रीतीनें स्त्रीशिक्षणास त्यांनीं चालना दिली. लेखांनीं, भाषणांनी, राष्ट्रीयत्वास व राष्ट्रीय संस्कृतीच्या विविध अंगांस चालना दिली. भारतीय कला व इतिहास यांचा कसा अभ्यास करावा तें शिकविलें. भारतीय कलांतून व संस्कृतींतून सर्वत्र प्रतीकवाद कसा आहे तें दाखवले. हें सारें करीत असतां, रस्ते झाडणें, शेजाऱ्यांची शुश्रुषा करणें,
पान:कला आणि इतर निबंध.pdf/१२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९