आपले हृदय असें उचंबळते का? निवेदिता हिंदुमुसलमानांच्या केवळ मारामाऱ्यांचा इतिहास पाहणारी नव्हती. थोर राष्ट्रीयतेच्या दृष्टीनें पाहणारी होती. स्वामी विवेकानंद महंमदाच्या जन्मदिवशीं उपवास करीत असत, त्याप्रमाणें बुद्धजयंती, कृष्णजयंतीसही ते करीत. अशा महापुरुषाच्या चरणांशीं बसून निवेदितेनें राष्ट्रसेवेचे व राष्ट्रीयतेचे धडे घेतले होते.
कलकत्त्यास 'मॉडर्न रिव्ह्यू' हें मासिक १९०७ मध्ये सुरू झालें. कोणताही नवीन उपक्रम असो, त्याला निवेदिता साहाय्य व्हावयाच्या. या मासिकासाठी त्या नेहमी लिहीत. त्या लेखाचीं पुस्तकें झाली आहेत. ते सारे लेख केवळ स्फूर्तिमय आहेत. हिंदुमुसलमान कशी नवसंस्कृति निर्मित होते, भारताचा संदेश काय, नवीन प्रश्न कसे हातीं घेतले पाहिजेत, भारतीय कलांतील विशेष कोणता, एक का दोन- शेंकडों विषयांवर त्या लिहीत. त्यांच्या लिहिण्यांत अभिजातता आढळून येते. प्रतिभा दिसून येते. इतिहाससंशोधक राजवाड्यांजवळ जशी एक प्रकारची प्रतिभा होती तशी निवेदितादेवीजवळ होती.
त्या पाश्चिमात्य देशांतीलही वर्तमानपत्रांस व मासिकांस लेख पाठवीत. लेख लिहूनच त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागे; परंतु एकदां एका युरोपियन संपादकानें "अशा अशा प्रकारचें दिहाल, तर इतके पैसे देऊं." असें सांगितलें. निवेदितेने कळविलें, "मी लिहीन तसें हवें असेल तर कळवा. दुसऱ्यांच्या मतांप्रमाणें मी लिहीत नसतें." त्या पैशासाठीं लिहीत नसत. त्यांच्या लिहिण्यांत त्यांचा आत्मा असे, त्यांना सांपडलेलें सत्य असे.
लेख लिहिणें व व्याख्यानें देणें हें त्यांचे काम असेच; परंतु कल
पान:कला आणि इतर निबंध.pdf/१०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७