संध्याकाळीं नटूनथटून नृत्यमंदिरांत नाचायला जावयाचें; आणि वर-खालीं, मागें पुढें, आजूबाजूस कटाक्ष फेंकतां फेंकतां एखादा अनुरूप उमदा मनुष्य हस्तगत होतो का पाहावयाचें, असाच कार्यक्रम सरसकट मुलींचा असावयाचा. वहिवाटीप्रमाणें फ्लोरेन्सला हें सर्व करावें लागे. पण तिच्या आईबापांच्या व मैत्रिणींच्या हें ध्यानांत येऊन चुकलें होतें कीं, या पोरीचें मन या कामांत नाहीं. आई म्हणे कीं, या बाईचें एकदां लगिन झालें, म्हणजे मी सुटलें बरें, लग्न होण्यास हरकत कांहींच नव्हती. ती आतां अगदीं पणांत आलेली होती. नाकाडोळ्यांनी मोठी देखणी असून बुद्धीचें तेजहि तिच्या तोंडावर झळकत असे. ती अंगानें सडपातळ, उंचेली, आणि नाजूक असून घारे डोळे आणि भुरे सडक केस यांनी तिच्या सौंदर्यात भर पडली होती. डोळ्यांत विचारीपणाची झांक असली, तरी अत्यंत मधुर अशी हास्योन्मुखताहि तेथें दिसून येई. अशा मुलीला मागणी घालणारे न भेटले तरच आश्चर्य! पण खरी गोष्ट अशी होती कीं, तिला पाहतांच जरी सर्वांच्या मनांत तिच्या लग्नाविषयींचा विचार येई, तरी तिच्या स्वतःच्या मनांत मात्र तो विचार कधींच आला नाहीं.
होता होतां आईनें एकदा लग्नाची गोष्ट प्रत्यक्षच काढली. ती आतां चांगली पंचवीस सव्वीस वर्षांची झाली होती. आईचा प्रश्न ऐकून फ्लोरेन्सनें विनयानें उत्तर केलें कीं, 'मला लग्न करावयाचें नाहीं; मला नर्स म्हणजे शुश्रूषिका व्हावयाचें आहे.' हे तिचें उत्तर ऐकून आई थक्कच झाली. नाइटिंगेल यांची मुलगी; आणि म्हणे ती 'सुईण होणार!' हे ऐकून तिला पराकाष्ठेचा अपमान व दुःख झालें. त्या वेळीं नर्सचा धंदा अत्यंत हीन समजत असत. हा पतकरणाऱ्या स्त्रिया अडाणी, मूढ, अभद्र बोलणाऱ्या, घाणेरड्या, वर्तनानें बेताल, दारुड्या आणि 'समाजांतील पडझड' म्हणून ज्यांना नांव देतां येईल, अशा असत. यांना वेतनहि सामान्य गडीमाणसांपेक्षां जास्त मिळत नसे; आणि समाजांत तर त्यांना कसलीहि प्रतिष्ठा नसे. आपली सोन्यासारखी पोर असल्या वाईट बायांच्या संगतींत जाणार, आणि त्यांचा धंदा करणार, हे ऐकून बापालाहि चैन पडेनासें झालें. वास्तविक पाहतां, खुद्द त्या धंद्यांत वाईट असें कांहींच नव्हतें; दुःखपरिहाराचें खिस्ती धर्मातलें अत्यंत उदात्त तत्त्व त्याच्या बुडाशीं असल्यामुळे तो धंदा मान्यच ठरावयास हवा होता; पण प्रत्यक्ष स्थिति मात्र निराळी होती. खुद्द इंग्लंडमध्ये तरी त्याला कसलाहि संभावितपणा किंवा पवित्रपणा प्राप्त झाला नव्हता, आईबापांनी
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४
कर्तबगार स्त्रिया