Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ह्या अंधळ्याच्या बायकोनें स्त्रीजात डोळस बनविली!


मिसेस् फॉसेट : ३ :


 इंग्लंडांतील स्त्रियांचें बंधविमोचन व्हावयास हवें, ही ध्वजा मोठेपणीं हातीं घेतलेल्या या स्त्रीचा जन्म १८४७ साली इंग्लंडच्या सफोक परगाण्यांतील अंडेबर्ग येथे झाला. हें खेडेंगांव म्हणजे ज्याच्याकडे कुणी ढुंकूनहि पाहूं नये, असेंच होतें. कुग्राम, दरिद्री, आणि सर्वथा मागासलेले असलें हें खेडें इंग्लंडांतील एका पराक्रमी स्त्रीला जन्म देणार आहे, असें भाकित जर आधीं कुणीं केलें असतें, तर लोकांनी त्याला वेड्यांतच काढलें असतें. पण एक गोष्ट ध्यानांत हवी कीं, सगळा गांव जरी निजलेला असला, तरी न्यून् गॅरेट म्हणजे मिसेस् फॉसेट् यांचे वडील हे मात्र नेहमीं जागे राहिलेले असत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारला ते लंडनच्या धान्यबाजाराला जात आणि चांगल्या प्रकारचा उदीम करीत. भोवतालचे लोक म्हणत कीं, 'शेठजींना आळस म्हणून कधीं नाहींच. दर पंधरा दिवसांनीं यांची लंडनला खेप असायचीच.' त्यांच्या व्यापाराटापारांत कितपत माया त्यांना जमा करतां आली, हें आपल्याला माहीत नाहीं; पण एक गोष्ट मात्र खरी कीं, लंडनच्या खेपा सारख्या केल्यानें गॅरेट शेठजींना नागर जीवनाची आणि स्त्रीशिक्षणाची थोडीशी कल्पना आलेली होती. गांवचे लोक घोरत पडलेले असले, तरी यांनीं मात्र आपल्या कुटुंबांत, घरगुती पद्धतीनेंच कां होईना, पण शिक्षणाचा फैलाव चांगला केलेला होता.
 मिसेस फॉसेट् यांचें माहेरचें नांव मिलिसंट असें होतें. मिलिसंटच्या वडील बहिणींचें शिक्षण हा गांवांत एक मोठा वादाचा मुद्दा बनून राहिला होता. परंतु न्यूसन् हे स्त्रीशिक्षणाचे पक्षपाती बनलेले असल्यानें, विरोधाला न जुमानतां वडील मुलगी एलिझाबेथ हिचें दुय्यम शिक्षण पुरें करून तिला वैद्यकाचें शिक्षण देण्याचें त्यांनी ठरविलें. १८६५ च्या सुमारास सुद्धां मुलींना वैद्यकाचें शिक्षण देणें म्हणजे इंग्लंडांतील वैद्यकाचीं महाविद्यालयें पापच मानीत. कोणच्याहि कॉलेजांत अर्ज