Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
कर्तबगार स्त्रिया
 


करावा, तर मुख्याधिकाऱ्यांनी कळवावें कीं, 'बायकांना आमच्या कॉलेजांत प्रवेश नाहीं.' परंतु, न्यूसन आणि एलिझाबेथ यांनीं एक खटलाच लढवायचें ठरवलें.
 वैद्यकाच्या कायद्यांत असें म्हटलें होतें कीं, 'अभ्यासाची सिद्धता झालेल्या सर्व माणसांना वैद्यकाच्या परीक्षेला बसण्याचा हक्क असावा.' न्यूसन गॅरेटनीं अर्ज केला कीं, " 'सर्व माणसांनीं' या शब्दांत स्त्रियांचाही समावेश झालाच पाहिजे; कारण स्त्रिया माणसेंच आहेत!" हे प्रकरण पुष्कळच गाजलें; आणि शेवटीं पंचांनीं आपला निकाल एलिझाबेथच्या बाजूनें दिला. एलिझाबेथ डॉक्टरीण झाली; आणि व्यवसाय करूं लागली. या लढ्याचा परिणाम मिलिसंट हिच्या मनावर फारच झाला.
 तिचें शिक्षण चालूच होतें; पण इंग्लंडांतही इतक्या अलिकडच्या काळांत सुद्धां स्त्रीशिक्षणाची व्यवस्था असावी तशी नव्हती; म्हणून न्यूसन् यांनीं घरच्या घरींच सर्व तऱ्हेचे शिक्षण मिलिसंट हिला दिलें. आणि मग सुशिक्षित स्त्रीच्या मनांत, स्त्रियांच्या हक्काचे जे प्रश्न उद्भवणें अगदी अटळ होते, ते या मिलिसंटच्या मनांत उद्भवूं लागले. इतक्यांत तिच्या जीविताला निराळेंच वळण लागण्याचा योग आला.
 मिलिसंट ही अजून पुरी वीस वर्षांचीही झाली नव्हती. तेव्हां हेन्री फॉसेट या तरुण गृहस्थाची व तिची ओळख झाली. हा गृहस्थ केंब्रिज येथें अर्थशास्त्राचा प्राध्यापक होता. हा सहा फूट तीन इंच उंच असून अंगाने चांगला धिप्पाड आणि पिळदार होता. त्याच्याकडे पाहतांच कोणाच्याही मनांत थोडासा आदर उत्पन्न झाल्याखेरीज रहात नसें. पण दुर्दैवानें त्याच्या ठिकाणीं एक वैगुण्य उत्पन्न झालें होतें. सुमारे पंचवीस एक वर्षांचा असतांना, बंदूक उडवण्याच्या कामी कांहीं अपघात होऊन त्याचे दोन्ही डोळे गेलेले होते. पण डोळे गेले असूनही या माणसाची चर्या आणि त्याचा रुबाब हीं लक्षांत भरण्यासारखी राहिलीं होतीं.
 डोंळे जातांच एकादा मनुष्य गळाठला असता, आणि दीनवाण बनून त्यानें जगाशीं संबंधही सोडला असता; पण हा फॉसेट् मोठा धीराचा माणूस होता. अंधळा होण्याच्या आधीं ज्या गोष्टी त्याला करतां येत असत. त्यांतील बऱ्याचशा त्यानें पुढें चालू ठेवल्या. पायांनीं सपासप चालणें, आणि बर्फावर स्केटिंग करणें याची त्याला फार हौस असे. अंधळा होऊनही या दोन्ही गोष्टी तो अगदीं डोळस माणसासारख्या करूं लागला. ज्या सडका त्याच्या ओळखीच्या होत्या, त्यांवर तर तो खुशाल सहलीला जाऊं लागला. पण जर कोणी मित्रानें एकाद्या नव्या सडकेचें