पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

I प्रतिमा यात हे असे अंतर पडत जाते. कविगतन्यायात आणि कलानुभवात जेव्हा ते बसते तेव्हा कलात्मक रूप निश्चित धारण करते. हा संवाद असा रंगत असला तरी संपूर्ण नाट्यानुभावात ही कलात्मकतेची जाण 'प्रबोधनकारांनी येथे ठेवलेली दिसत नाही. 'कुंती' माणसांच्या भयानं माणुसकीला बेमान बनलीस, तरी भूतदयेचा चटका सुद्धा तुझ्या काळजाला बसू नये आं?' या कर्णाच्या प्रश्नाला मातेचे काय उत्तर असणार? असे हे निकराचे प्रसंग आहेत. के. सी. ठाकरे यांनी या कर्णकुंती संवादाची अखेर आपल्या मार्मिक कल्पकतेची जोड देऊन नाट्यपूर्ण प्रसंगाच्या योजनेने केली आहे. नाट्यमय प्रसंगाची भर :- कर्णकुंती संवाद चालू असतांनाच दुर्योधन गुपचूप मागे येऊन उभा राहतो. शिवाय याचवेळी तेथे कृष्णही येतो. हा नाटककाराने स्वतःच्या कल्पनेने योजिलेला प्रसंग आहे. यावेळचा संवाद यामुळे अर्थपूर्ण होतो. 'लौकिकाला घाबरली तरी प्रेमाला पारखी न झालेली अशी मी कुंती आहे, असे कुंती म्हणते. यावर 'कौरवांच्या मिठाला न् इमानाला हा कर्ण प्राण गेला तरी बेईमान होणार नाही' असे मागे उभ्या असलेल्या दुर्योधनाला सुखावणारे उद्गार कर्ण काढतो. सत्यनिष्ठ राष्ट्रवीर म्हणून कर्णाची जिवंत राहण्याची प्रतिज्ञा ऐकून तृप्त झालेला दुर्योधन म्हणतो 1 'कर्णा तुझ्या धन्यतेच्या थोरवी पुढं सूर्याचे तेज सुद्धा फिकं पडेल. ' 'कर्णा, तुझ्यावरुन हा जीव ओवाळून टाकावा. ' 'तू माझा परमेश्वर आहेस. ' असा एखादाच नाट्यत्म प्रसंग येथे दिसतो. १२ सामाजिक विषमतेला वाचा फोडली :- 'टाकलेलं पोर' या नाटकाचा खरा रोख विषमतेच्या प्रश्नाला वाचा फोडणे हाच आहे. त्यासाठी कर्णकथा येथे राबविली गेली आहे. कृष्णाच्या उद्गारातून हेच सूचित होते. " ठाकरे उपेक्षितांच्या दुःखांना कर्णाच्या निमित्ताने चित्रित करण्याचा प्रयत्न करीत असले तरी उपेक्षितांच्या अंतरंगाचा सखोल ठसा येथे कलात्मक पातळीवरुन उमटत नाही. कर्णाच्या निमित्ताने उपेक्षितांवरील अन्यायाचे आणि त्यांच्या वेदनेचे बहिर्मुख व प्रगट चिंतन येथे व्यक्त झाले आहे. सामाजिक आशय कर्णकथेत भरण्याच्या या प्रयत्नात नाटककाराने काही हृदयस्पर्शी, मार्मिक प्रसंग नव्याने ४२ ॥ कर्ण आणि मराठी प्रतिभा