पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घडविले आहेत. कर्णाचा लाडका मुलगा वृषसेन निधन पावल्याचे ऐकून कर्णाला समाधान वाटते. तो म्हणतो मी द्रोणाचार्य नाही.' या कर्णाच्या उद्गारातून अपत्य स्नेहाने भावविवश झालेल्या द्रोणाचार्याचे सारे व्यक्तित्त्व प्रगट झाले आहे. 'कर्ण पहिला पांडव आहे हे जर माहीत असते तर मी कृष्णाग्रहाने सुद्धा अधर्म वध केला नसता.' असे अगतिक अर्जुनाचे उद्गार कारुण्याने काठोकाठ भरलेले आहेत. नाटकाच्या शेवटी शोकग्रस्त कुंतीचे वर्णन केल्यामुळे या नाटकात अपेक्षित परिमाणकारकता आली आहे. असे काही कल्पक प्रसंग महाभारतकथानकाला अधिक परिणामकारक करतात. यामुळे महाभारतात नवी भर पडते आणि महाभारत मराठी प्रतिभा आपल्या परीने वाढविते, हे कटाक्षाने जाणवते. महाभारतकथेचा प्रचारासाठी झालेला वापर याचे एक उत्कृष्ठ उदाहरण हे नाटक आहे. प्रत्येक लेखकाच्या व्यक्तित्त्वाचा ठसा त्याच्या लेखन कृतीवर उमटतो यानुसार प्रबोधनकार ठाकरे यांच्या व्यक्तित्वाचा ठसा या नाटकात उमटला आहे. - पहिला पांडव :- कर्णाच्या जीवनाची शोकांतिका चित्रित करण्यासाठी शि. म. परांजपे यांनी 'पहिला पांडव' हे नाटक लिहिले आहे. वसंत देसाई या नाटकाच्या हेतूविषयी म्हणतात 'ज्यांचा राज्यावर हक्क त्यांच्या दुर्दैवानें ते सूतपुत्र ठरून त्यांचा पराक्रमही विफल ठरावा हे असे का, हा एक प्रश्न नाटककाराने भारतवर्षीयांसमोर टाकला आहे १४ या नाटकाच्या दर्जावरून के. सी. ठाकरे यांना हे नाटक शि. म. परांजप्यांच्या नावावर कुणीतरी खपविल्यासारखे वाटते. कर्त्याच्या नावाप्रमाणेच या नाटकाच्या नावाचीही चर्चा झालेली आहे. 'प्रथम या नाटकाचे नाव 'कर्णवध' असे होते पुढे त्याचे नाव 'पहिला पांडव' असे ठरले. १५ 'पहिला कुंतीचा पंडूशी विवाह होण्यापूर्वी कर्णाचा जन्म झाला म्हणून पांडव' हे नाव अयोग्य ठरते. तेव्हा या नामचर्चेचा हेतू एवढाच की 'कर्णवध' या नावातून कर्णाची शोकांतिका सूचित होते आणि 'पहिला पांडव' म्हणण्यातून कर्णाचा पांडवपक्षातील अधिकार - अग्रक्रम सूचित होतो. म्हणजे नाटककाराच्या मनात कर्ण पहिला पांडव असूनही कर्णाचा वध झाला, ही तीव्र जाणीव दिसते आणि त्यातूनच या नाटकाला आकार लाभला आहे. कथानकाची मांडणी :- महाभारतातील कर्णाचे जीवन करूण रसाच्या आविष्काराला अत्यंत पोषक आहे. शि. म. परांजपे यांनी कर्णाची कथा त्या दृष्टीने सादर केली आहे. कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ४३