पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

येथे कमालीचा तीव्र बनतो. असभ्य आणि आक्रस्ताळी भाषा वापरण्यापर्यंत मजल जाते ११ नाटककाराला तो मोह आवरत नाही. कर्ण उपरोधिक शब्दात भेटीसाठी आलेल्या कुंतीचे स्वागत करतो. 'या, हा अधिरथ - राधापुत्र कर्ण आपल्याला वंदन करतो.' या वाक्याने कुंती चरकते. " म्हणून काय संख्या पाठच्या भावाच्या वधानं तू आपल्या बीजाशी बेइमान होणार ?' असे त्याला विचारते. यावर कर्णाने दिलेले उत्तर मोठे लक्षणीय आहे. 'बीजापेक्षा ब्रीदाची किंमत मला विशेष वाटते. बीजाची चौकशी करण्याची मला कधी गरजच पडलेली नाही, आणि मला तिचे महत्त्वही वाटत नाही.' हा संघर्ष असाच तीव्र बनत जातो. वि. वा. शिरवाडकरांनी तर आपले संपूर्ण नाटक या एकाच प्रसंगावर उभारले आहे. एका प्रसंगाचे किती भिन्न तन्हेने चित्रण होऊ शकते याचा नमुना म्हणून 'कर्ण कुंती भेट' हा प्रसंग लक्षात घेण्याजोगा आहे. या प्रसंगाच्या चित्रणासाठी 'मृत्युंजय' आणि 'राधेय' कादंबरीत काही आणखी अनोखे रंग योजिलेले आढळतात. (त्याचा योग्य ठिकाणी त्या त्या साहित्यकृतीच्या संदर्भात विचार केला आहे.) 'टाकलेलं पोर' मधील या संवादाचे वैशिष्ट्य असे की सामाजिक समस्या त्यात गोवलेली आहे. निसर्ग धर्म आणि समाजधर्म यातील संघर्षात कर्णाचा आयुष्यभर तेजोभंग होतो. आणि कुंतीला 'ते दिव्य मातृहृदय' गमावल्याचे दुःख वाटत राहते. 'भ्रूणहत्येपेक्षा लोकमान्यतेची हत्या बरी' असे कर्णाला वाटतं. त्याच्या मनाची घालमेळ येथे उत्कटपणे प्रगट झाली आहे. 'निसर्गानं निर्माण केलेली जिज्ञासा पुरविण्यात दुलौकिक कसला ? आणि लौकिकाची चाड बाळगायची, तर निसर्गाची तरी पर्वा कशाला ? मातोश्री : निसर्ग प्रत्ययी असतो, आणि लौकिक परिपाठी असतो, यातले कोणते तरी एक साधते, असे या 'टाकलेल्या पोरा'ला वाटते. एका मूलभूत समस्येला येथे नाटककाराने स्पर्श केला आहे. 'निसर्ग आणि लौकिक यात स्वीकारावयाचे कोणते ?' असा तो प्रश्न आहे. 'कर्णायन' मध्ये कुंती निसर्गाला सामोरी गेल्याबद्दल दांडेकरांनी सहानुभूती व्यक्त केलेली आहे. महाभारतातल्या कर्णकुंती संवादात कर्ण कुंतीला अभयवचन देतो या गोष्टीला महत्त्व आहे, पण मराठी लेखकांनी या प्रसंगाला फुलविले आहे. 'गंगेच्या ओघातल्या निर्दय त्यागापेक्षा गर्भहत्या चालली असती.' असे जेव्हा 'टाकलेलं पोर' मोठे होऊन उपेक्षित जीवनाने होरपळ्यावर म्हणू लागते, तेव्हा रसिकांच्या अंतःकरणाला पीळ पडल्याशिवाय राहत नाही. शिवाजी सावंतांच्या मृत्युंजयमध्येही कर्ण असाच सवाल कुंतीला विचारतो. 'व्याघ्रीसुद्धा आपल्या पहिल्या पिलाला खाऊन टाकते म्हणतात' असे हे प्रतिभावंतांच्या अभिव्यक्तीतील विविध समतोल आहेत. महाभारतातील कर्णाची प्रतिमा आणि या मराठी ललित साहित्यातील कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ४१