पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आमच्या हाती लागू द्या की. ७ विद्रोहाची आणि प्रस्थापितांविरुद्ध बंड पुकारण्याची भाषा नाटककाराने कर्णमुखाने येथे योजिली आहे. येथे दलित साहित्यातील जळजळीत उद्गाराची आठवण होते. पुराणकथेला प्रतिभावंतांच्या प्रतिभेचे हे असे विलास ( स्वतःच्या मनातील सामाजिक आशयाने) भरून टाकतात आणि मग खरा कर्ण कोणता असा संभ्रम निर्माण होतो. कर्णाचे हे ज्वालाग्राही उद्गार म्हणजे नाटककाराच्या काळजातील तळमळ आहे उपेक्षितांचे अंतरंग जाणून घेऊन त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करण्यासाठी समाजधुरिणांना, दलितांच्या नेत्यांना अतिशयोक्तीचा आधार घ्यावा लागतो. अतिशयोक्त अवाजवी बोलावेच लागते. तेव्हा समाजातील उच्चश्रूंना जाग आली तर येईल व त्यांची घोरनिद्रा भंग पावू शकेल असे नाटककाराला वाटते. मात्र कलामूल्यांची जाणीव न ठेवता येथे प्रचार केलेला आहे. - बहिर्मुख वृत्तीतून हे प्रबोधन आले आहे. कर्ण : दलितांचा प्रतिनिधी :- निमित्ताने' या लेखात म्हणतात प्रा. नरहर कुरुंदकर आणि प्रिं. अ. दा. आठवले यांनी कर्णाला दलितांचा प्रतिनिधी मानता येत नाही, असे म्हटले आहे. प्रा. नरहर कुरुंदकर 'सूर्यपुत्राच्या ...... कर्णाकडे पाहतांना सर्व समाजाने उपेक्षा आणि अवहेलना केलेला, भाबडा आणि हळवा जीव या पद्धतीने पाहणे हा आधुनिक लेखकांच्या स्वतःच्या भावनाप्रधान मनाचा खेळ आहे." प्रा. कुरुंदकरांच्या दृष्टीने खरा शूद्र प्रतिनिधी 'विदुर' ठरतो आणि ते पटण्याजोगे आहे. 'स्वतःच्या समाजाच्या उन्नतीसाठी रक्ताचे पाणी करणारे डॉ. आंबेडकर . आणि वैयक्तिक स्थानमानासाठी धडपडणारा कर्ण यांची मुळी तुलनाच होऊ शकत नाही.” असे श्री. आठवले यांनी म्हटलेले आहे. या जाणकारांच्या मतांविषयी मतभेद असण्याचे कारण नाही पण कर्णाच्या जीवनाचा एक पैलू 'कौंतेय' असूनही 'राधेय' म्हणून वावरावे लागले, या उपेक्षेने घडला आहे. म्हणून ललित साहित्यिकाला जर कर्णाच्या जीवनात उपेक्षा जाणवली तर त्यात गैर काही नाही. परमार्थाने न घेता ते मर्यादित अर्थाने स्वीकारता येईल. बऱ्याच साहित्यिकांनी कर्णाच्या जीवनाच्या या अंगाला स्पर्श केला आहे. एकदा कर्ण ही पुराणकथेतील व्यक्ती म्हणून आपण स्वीकारल्यानंतर अनेक कल्पना अशा व्यक्तीवर आरोपित करता येतात. 'कर्ण' येथे निमित्त होतो आणि लेखक आपल्या विचारभावनांचा मुक्त विलास करतो. १० निसर्ग की लौकिक :- 'टाकलेलं पोर' या नाटकात कर्ण कुंतीच्या भेटीच्या प्रसंगाला महत्त्व प्राप्त होणे स्वाभाविक आहे. कर्ण कुंती यांच्या भेटीत निर्माण झालेला संघर्ष अपेक्षेप्रमाणे ४० || कर्ण आणि मराठी प्रतिभा