पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुरुषोत्तमाचे कथानक आणि शिवरामपंत परंजप्यांसारखा तर्ककुशल रसाळ लेखक, फार मौज अनुभवायला मिळेल, अशा आशेने मी नाटकाला गेलो. पण निराशेने नि संतापाने घरी परत आलो. इतक्या अर्कट 'भटी' वृत्तीने कर्णचरित्राची विटंबना शिवरामपंतांसारख्या स्वाभिमानी नि स्वदेशाभिमानी माणसाला करवली तरी कशी? याचा अजूनहि मला अचंबा वाटत आहे. 'मला कोणीतरी क्षत्रिय म्हणा हो' असे प्रत्येकाला आळवीत रडणारा आणि अभिमन्यूचे भूत पाहताच भेदरून बोबडी वळलेला कर्ण महाभारतात तरी खास आढळणार नाही. मग असला रडका, भेदरट कर्ण कल्पनेच्या कुंचल्याने रंगविण्यात लेखकाला कोणत्या चळवळीवर काळ्या शाईचे शिंतोडे उडवावयाचे होते, हे महाराष्ट्र नाटक मंडळीच्या धांदरट, बावळट चालकांना जरी समजले नाहीं, तरी जाणत्यांनी त्या टिंगलीचा वा बदनामीचा ठाव तेव्हाच घेतला होता. या बदनामीच्या निषेधार्थ प्रस्तुत नाटिकेंत कर्णाच्या तोंडी मी घातलेले उद्गार, खुद्द नाटिकेंत योग्य स्थळ न मिळाल्यामुळे, मी बाजूला काढून ठेवले होते. ते याच ठिकाणी उमटवून ठेवण्याची संधि मी साधीत आहे. २ एवढचा विस्ताराने ह्या प्रास्ताविकातील भागाची येथे नोंद घेण्याचे कारण त्यावरून कर्णजीवनावरील या नाटकाच्या निर्मिती मागील भूमिकेची कल्पना येते, आणि परांजपे यांच्या 'पहिला पांडव' या नाटकावरील ठाकरे यांची तीव्र प्रतिक्रियाही लक्षात येते. प्रतिक्रियात्मक नाटक :- 'टाकलेलं पोर' कर्णविषयीच्या सहानुभूतीतून आणि अनुकम्पेतून जन्माला आलेले नाटक आहे. 'पहिला पांडव' ची प्रतिक्रिया असे काहीसे प्रतिक्रियात्मक स्वरूप या नाटकाला प्राप्त झाले आहे. येथे मुद्दाम कर्णाची बाजू घेतलेली दिसते. एखाद्या व्यक्तिरेखेची बाजू मुद्दाम घेऊन जेव्हा लेखन केले जाते तेंव्हा कलानिर्मितींच्या दृष्टीने ते बाधक ठरते. महाभारतीय कर्णाचे हे नाट्यरूप म्हणूनच फारसे कलात्मक ठरत नाही. तात्कालिक प्रक्रियेतून व प्रतिक्रियेतून हे नाटक स्फुरले आहे. 'पहिला पांडव' विषयी ठाकरे यांनी प्रस्तावनेत एक शंकाही प्रगट केली आहे. बालहत्येचा प्रश्न व समाजसुधारकाची व्यथा :- " टाकलेलं पोर या नाटकात अपत्यहत्येचा प्रश्न तर प्रधान आहेच आहे, पण त्याहिपेक्षा, मागासलेल्या नि पददलित समाजातील स्वाभिमानी उद्धारकांना आत्मोन्नतीचे शिखर गाठण्यासाठी कसकसल्या सामाजिक विकल्पांना नि अडचणींना तोंड देऊन आपला मार्ग आक्रमावा लागतो याचे दृश्य रंगविण्याचा कर्णाच्या कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ३७