पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्तमान परिस्थितीशी संबंध प्रस्थापित करून अद्भुत कल्पनानिर्मित संविधानके योजण्यापेक्षा आपला विशिष्ट हेतू गृहीत धरून पौरणिक कथाभागांना वर्तमानकाळाच । रंग देण्यात येऊ लागला. पुराणकाल आणि वर्तमानकाल यांचा एक नवा अनुबंध या नाटकात प्रस्थापित झाला. उपरोक्त तीन्ही नाटकात वर्तमानात रमलेल्या के. सी. ठाकरे, शि. म. परांजपे, वि. ह. औंधकर या लेखकांनी असाच प्रयत्न केला आहे. केवळ मनोरंजनाचा प्रधान हेतू येथे बाजूला ठेवून वर्तमानपरिस्थितीत प्रबोधन करण्याचा नाटककाराचा हेतू येथे आहे. पुराणातील, महाभारतातील व्यक्ती घेऊन त्यातूनच आधुनिक व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या करण्याचा नवा मार्ग खाडिलकरांच्या कीचकवध (१९०१ ) पासून खुला झालेला होता. सामाजिक आणि राजकीय हेतूने महाभारतकथानकांचा सर्रास उपयोग या कालखंडात करून घेतला जात होता. या प्रवृत्तीतूनच मराठी नाटकात कर्णाच्या व्यक्तित्वाची व जीवनाची पृथगात्म चित्रणे आढळतात. 'नवनिर्मितीसाठी कथानक हे अवश्यमेव नवीन पाहिजे हे म्हणणे केवळ दुराग्रहमूलक आहे. एवंच एकंदर मराठी महाभारतें ही नवनिर्मिती असून ती स्वतंत्र आहेत हे सिद्ध होते." अशा आशयाचे विचार डॉ. नांदापूरकरांनी आपल्या प्रबंधात मांडले आहेत. या न्यायाने येथे पृथगात्मता आहे म्हणून ही नवनिर्मिती आहे. 'टाकलेलं पोर' :- प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांनी कर्णकथेवर 'टाकलेलं पोर' हे तीन अंकी पौराणिक नाटक लिहिले. कर्णावरील साहित्यकृतींची शीर्षके मोठी बोलकी आणि सूचक आहेत असे या शीर्षकांवरुन दिसून येते. 'टाकलेलं पोर' हे शीर्षक असेच सूचक आहे. नाटककाराचा कर्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे. त्यातून आयुष्यभर कर्णाची उपेक्षाच झाली, असे लेखकाला सुचवावयाचे आहे, असे दिसते. 'खरा ब्राम्हण' या त्यांच्या नायकानंतर हे नाटक प्रसिद्ध झाले असले तरी त्याचे लेखन त्यांनी तत्पूर्वीच केलेले होते. नाटकाची जन्मकथा :- या नाटकाची जन्मकथा प्रस्तुत अध्ययनाला मोठी उपकारक आहे. ही लक्षणीय 'जन्मकथा' नाटककाराच्या शब्दात लक्षात घेणे उचित ठरते. 66 'महाभारत महाकाव्याचा चिकित्सक स्वाध्याय करीत असतांना, त्यातल्या कर्णाच्या भूमिकेने मला चटका लावला होता. तशांतच सन १९३० साली कर्जत (जि. कुलाबा) मुक्कामी महाराष्ट्र नाटकमंडळीचा कै. शिवरामपंत परांजपेकृत 'पहिला पांडव' नामक नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी लाभली. कर्णासारख्या उदारचरित ३६ ।। कर्ण आणि मराठी प्रतिभा