पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

· ललित साहित्यिकांना याच दृष्टीने विशेष जवळचा वाटला आहे, असे दिसते. या साहित्यिकांना कर्णाच्या जीवनातील घटना आणि प्रसंगांची मालिका आमच्याही व्यथा आणि वेदनांशी नाते सांगणारी वाटते. 'कौंतेय' असून 'राधेय' म्हणून जीवन जगण्यात दैवाने घडविलेला हा खेळ सगळ्यांच्या मनात कर्णाविषयी सहानुभूती निर्माण करणारा आहे. दातृत्त्व, जन्मवृत्त, उपेक्षा या गोष्टींचा प्रतीक म्हणून आज कर्ण ओळखला जातो. 'कर्ण' ही नुसती महाभारतातील व्यक्ती न राहता कर्णाची एक पुराणकथा तयार झाली आहे आणि ही पुराणकथा अनेक मराठी लेखकांच्या अनुभवाचा भाग बनली आहे. ललित साहित्यिकांनी ही पुराणकथा रिती करून त्यात आपले अनुभव भरले आहेत. महाभारतातील व्यक्तिरेखांना दुर्गा भागवतांनी पारदर्शक म्हटले आहे. ते कर्णाला तंतोतंत लागू पडते. मराठी साहित्यिकांनी कर्ण या व्यक्तीची आणि कर्णकथेची उद्बोधन, रंजन व कलात्मक निर्मिती यासाठी योजना केली आहे. मानवी मनाचे आणि जीवनाचे विविध धागे उलगडण्यासाठी त्यांना कर्णाचा आधार वाटला, पौराणिक तपशिलाचा आणि वास्तवाचा आधार घेऊन भिन्न भिन्न परिस्थितींचे चित्रण करण्यासाठी कर्णाचे व्यक्तित्त्व त्यांना काव्यविषय म्हणून आस्वाद्य वाटले असले पाहिजे. कर्णाच्या व्यक्तित्वाचा विविध आणि विशिष्ट दृष्टिकोनातून वेध घेण्याचा प्रयत्न करणान्या या साहित्यिकांमध्ये असामान्य मान्यवरांप्रमाणेच नवोदित साहित्यिकांचाही समावेश आहे. कर्णाविषयीच्या वैचारिक साहित्याने काही ललित कलाकृतीनां प्रेरणा दिली आणि काही ललित साहित्यकृतींना वैचारिक लेखन-निर्मिती भाग पाडली म्हणूनच कदाचित लेखन वैपुल्याने झाले असले पाहिजे. आरंभीचे प्रयत्न :- कर्णाविषयी भारतीय वीरदाता कर्ण (का. रं. वैशंपायन), अभिनव कर्णवध नावाचे चतुष्प्रवेशात्मक नाटक (शं. मो. रानडे), महारथी कर्ण (बा. वा. फाटक), महावीर कर्ण (वा. कृ. बोडस ) या अर्वाचीन कालखंडातील आरंभीच्या व अगदी सामान्य साहित्यकृती आहेत. पण शाळकरी स्वरुपाच्या व मराठीकरणाच्या प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या या साहित्याची फारशी दखल घेण्याची येथे आवश्यकता नाही. या काळात 'अपरिणत अवस्थेतील प्रयोग' आणि 'नाट्यम् भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्।' या उक्तींत सामावलेल्या आशयातून पौराणिक नाटक बाहेर पडू लागले. कारण एवढ्यावर या नाटककारांचे समाधान होईनासे झाले. यावेळी नाटक हे एक मनोरंजनाचे प्रतिष्ठित साधन होऊन बसले होते, पण यापेक्षा एका वेगळ्या दृष्टिकोनातून नाट्यनिर्मिती सुरू होत असतांनाच कर्णाच्या जीवनावरील तीन नाटके [टाकलेलं पोर (१९२८), पहिला पांडव (१९३१) व महारथी कर्ण (१९३४)] जन्माला आली व विशेष गाजली. कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ३५